गडचिरोली : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील शाळा 3 ऑगस्टपासून सुरू होतील, अशी स्थिती आहे. त्याअगोदर सर्व शाळा सॅनिटाईझ करुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे शुक्रवारी दिली.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात वनहक्क प्रलंबित दाव्यासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. सध्याची परिस्थिती बघता सर्व शाळांना मास्क, सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू पुरविण्यासाठी तातडीने प्रयत्न करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.