गडचिरोली -भामरागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य पथक ताडगाव अंतर्गत असलेल्या कोसफुंडी गावातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका गरोदर महिलेची आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे सुखरुप प्रसुती झाली आहे. बाळ व माता सुखरुप आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये जाण्यासाठी चांगला रस्ताही नसल्याने वाहने जाऊ शकत नाही. वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. प्रसूतीचा दिवस आल्यानंतर दवाखान्यात राहायला काही लोक तयार होत नाहीत. त्यामुळे अनेक जण रुग्णालयात न जाता गावातच वैदूकडे उपचार घेणे पसंत करतात. अनेक महिलांची प्रसूती ही घरीच करतात. आशाच प्रकार भामरागड तालुक्यतील कोसफुंडी गवातील एका गरोदर महिला आरोग्य तपासणीसाठी हेमलकसा लोकबिरादरी दवाखान्यात दाखल झाली. त्यांना कोविडची लक्षणे दिसून येत असल्याने कोविड तपासणीसाठी भामरागड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रसूती दिवसही जवळ आली आहे सुखरुप प्रसूतीसाठी दवाखान्यात भर्ती रहायला सांगितले. तरी ती ऐकायला तयार नव्हती. डॉक्टरांनी तहसीलदार व ठाणेदाराला समजावून सांगण्यासाठी बोलविले. त्यांनीही दवाखान्यातच राहण्याची सल्ला दिला. त्यानंतरही ती महिला न ऐकता गावी निघून गेली.