गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली भामरागड तालुक्यात गेल्य चार पाच दिवसापासून झालेल्या अकाली पाऊसामुळे तालुक्यातील एकमेव धान पिकाला त्याचा फटका बसला आहे. विशेषतः मध्यम व हलक्या धानाची कापणी सुरु असतांना आलेल्या अकाली पाऊसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेकटरी 50 हजार रुपायांची मदत देण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपध्यक्ष सुनील बिस्वास यांनी केली आहे.
गडचिरोली : अकाली पावसामुळे धान पिकाला मोठ्या फटका
सुरुवातीला अतिशय कमी पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी धान उशीरा लावला. ज्या शेतकऱ्यांनी दिवसरात्र शेतात पिकवलेला धानपीक वेळेवर पाऊस आल्याने त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
सुरुवातीला अतिशय कमी पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी धान उशीरा लावला. ज्या शेतकऱ्यांनी दिवसरात्र शेतात पिकवलेला धानपीक वेळेवर पाऊस आल्याने त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. शेतकऱ्यांनी हलक्या मध्यम धानाची कापणी सुरु झाली होती. त्यातच अकाली पावसामुळे धान शेतातच पडुन होत्या. त्यामुळे पावसात भिजल्या. अनेकांचा शेतात अजूनही पाणी साचून राहीले. दुसऱ्या दिवस ओला झालेला धान उचलून बांधीवर ठेवून सुकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पावसामुळे धानाचे झालेले नुकसान पाहाता शासनाने तातडीने पावले उचलावे. तसेच एक हेक्टरी 50हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांचा वतीने भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिस्वास यांनी माननीय मुख्यमंत्री कडे पाटविलेला लेखी निवेदनात केली आहे.
हेही वाचा -Tadoba National Park : खासदार सुप्रिया सुळेंनी शेअर केला काळ्या बिबट्याचा 'तो' व्हिडिओ