गडचिरोली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्राच्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. उद्या 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यात गडचिरोलीत 20, अहेरी व आरमोरी येथे प्रत्येकी 14 अशा 48 टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यामुळे साधारणतः 11 ते 12 वाजेपर्यंत तीनही विधानसभा क्षेत्राचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीपूर्वी नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. मात्र, गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून मतदानाला मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये तब्बल 70.26 टक्के मतदान झाले. यामध्ये अहेरी विधानसभेत 70.34, आरमोरीत 72.13 तर गडचिरोली विधानसभेत 68.54 टक्के मतदान झाले आहे.