गडचिरोली - जिल्ह्यात अतिदुर्गम भागातल्या दोन गावामध्ये एकाचवेळी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरुन गेली होती. मात्र, प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे राज्याच्या सीमेवरील रामंजापूर आणि रामासगुडाम ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील रामंजापूर आणि रामासगुडाम ही दोन आदिवासीबहुल गावे कोरोनामुक्त - Ramanjapur and Ramasgudam
सिरोंचा तालुका हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आणि तेलंगणा व छत्तीसगढ राज्यांच्या सीमेवर आहे. तालुका मुख्यालयापासून 65 किमी अंतरावर घनदाट जंगलात रामासीगुडम हे आदीवासी बहुल लोकसंख्या असलेले गाव आहे. छत्तीसगड सीमेलगत असलेल्या या गावात 55 रुग्ण पाझिटीव्ह आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरुन गेली होती. या गावात कुठलेही संपर्काचे साधन तसेच आरोग्याच्या सोई सुविधा नाहीत. इथल्या नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन केल्यामुळे तसेच तालुका प्रशासन आणि आरोग्य व ग्रा.पं. प्रशासनाच्या प्रयत्नातून रामासीगुडम आणि रामंजापुर ग्रामपंचायतीची सर्व गावे पुर्णपणे कोरोनामुक्त झाली आहेत.
सिरोंचा तालुका हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आणि तेलंगणा व छत्तीसगढ राज्यांच्या सीमेवर आहे. तालुका मुख्यालयापासून 65 किमी अंतरावर घनदाट जंगलात रामासीगुडम हे आदीवासी बहुल लोकसंख्या असलेले गाव आहे. छत्तीसगड सीमेलगत असलेल्या या गावात 55 रुग्ण पाझिटीव्ह आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरुन गेली होती. या गावात कुठलेही संपर्काचे साधन तसेच आरोग्याच्या सोई सुविधा नाहीत. अशा गावात तहसीलदार सय्यद हमीद नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार उपचाराचे किट आणि एक आरोग्यसेविका सोबत घेऊन पोहोचले. त्यांनी तिथल्या शाळेतच रुग्णांवर उपचार सुरू केले. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी गावात जनजागृती करण्यात आली.
दुसरीकडे तालुक्यात तेलंगणाच्या सीमेवरील रामंजापुर या गट ग्रामपंचायतीच्या चार गावात शंभर रुग्ण पाझिटीव्ह आढळले. यात मंडलापुर येथे सर्वाधिक सत्तर तर बाजुच्या गावात उर्वरीत पंचवीस रुग्ण सापडले. या गावाचा सिरोंचा शहराशी दैनंदिन संपर्क येत असल्याने या भागात कोरोनाला थोपवण्याचे प्रशासनासमोर आव्हान होते. तहसीलदार सय्यद हमीद, उपसभापती रिक्कुला कृष्णमुर्ती, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. कन्नाके आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक अश्विन वल्केच्या मार्गदर्शनात काही रुग्णावर गावातल्या शाळेत आणि इतरांना कोविड सेंटरला हलवून उपचार करण्यात आले. रामासीगुडम आणि रामंजापूर ही गावे छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेला लागून असल्याने इतर गावामध्ये धोका वाढला होता. मात्र, तालुका प्रशासन आरोग्य व ग्रा.पं. प्रशासनाने त्वरित वैद्यकिय मदत गावात पोहचवून उपचार सुरू करत जनजागृती केली. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन केल्यामुळे तसेच तालुका प्रशासन आणि आरोग्य व ग्रा.पं. प्रशासनाच्या प्रयत्नातून रामासीगुडम आणि रामंजापुर ग्रामपंचायतीची सर्व गावे पुर्णपणे कोरोनामुक्त झाली आहेत.