गडचिरोली - जिल्ह्यातील आरमोरी नगरपालिकेच्या 20 कामगारांनी (Aarmori Nagarpalika Workers Protest) गडचिरोली शहरातील मुख्य गांधी चौकातील पाणीटाकीवर चढून आंदोलन (Sholay Style Protest) केले. आरमोरी शहरात कार्यरत या कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकले होते. कंत्राटदाराकडे किमान वेतनाची मागणी केल्यानंतर कंत्राटदाराने निलंबनाची कारवाई केली होती. या विरोधात कामगारांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, त्यानंतरही कुठलाही तोडगा निघत नसल्याने पाणी टाकीवर चढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.
मुख्य गांधी चौकात थेट पाणी टाकीवर चढलेल्या आंदोलकांमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, गडचिरोली पोलीस ठाण्याचे पथक आंदोलकांशी वाटाघाटी करत घटनास्थळी तैनात आहे.