महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत नक्षल सप्ताहाचा विरोध; ठिकठिकाणी नक्षल विरोधी बॅनर लावत घोषणाबाजी - Gadchiroli naxal area

दुर्गम भागातील नागरिकांनी ठिकठिकाणी नक्षल विरोधी बॅनर लावले. २८ जुलैपासून नक्षल सप्ताह आम्ही आदिवासी जनतेने कशासाठी पाळावा? असा खडा सवाल नागरिकांनी नक्षलवाद्यांना केला आहे.

Naxal
गडचिरोलीत नक्षल सप्ताहाचा विरोध; ठिकठिकाणी नक्षल विरोधी बॅनर लावत घोषणाबाजी

By

Published : Jul 26, 2020, 1:43 PM IST

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान पुकारलेल्या बंदला दुर्गम-अतिदुर्गम भागासह जिल्हाभरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला. जिल्ह्यातील ग्यारपत्ती, गट्टा(जा), हेडरी, कोठी आदी दुर्गम भागातील नागरिक एकजूट येत नक्षल सप्ताह पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखवत जोरदार विरोध दर्शविला आहे.

दुर्गम भागातील नागरिकांनी ठिकठिकाणी नक्षल विरोधी बॅनर लावले. २८ जुलैपासून नक्षल सप्ताह आम्ही आदिवासी जनतेने कशासाठी पाळावा? असा खडा सवाल नागरिकांनी नक्षलवाद्यांना केला आहे. नक्षलवाद्यांकडून सप्ताहात खून ,जाळपोळ, व दहशत निर्माण करून आदिवासी जनतेला भयभीत केले जाते. असा नक्षल सप्ताह आमच्या काय कामाचा? आजपर्यंत आदिवासी जनतेच्या विकासासाठी नक्षलवाद्यांनी काय केले? असा सवाल देखील जिल्हाभरातील आदिवासी बांधवांनी नक्षलवाद्यांना विचारला आहे.

तसेच आम्हा आदिवासी समाजाकडून कोणताही नक्षल सप्ताह पाळला जाणार नाही, असे ठणकावून सांगण्यात आले. नक्षलवादास विरोध दर्शविणारे बॅनर उभारले. बॅनरच्या माध्यमातून नागरिकांनी नक्षलवादी आदिवासी जनतेवर करत असलेल्या अन्याय, अत्याचाराबद्ल निषेध नोंदविला आहे. नक्षलवाद्यांनी आजपर्यंत जिल्ह्यातील ५३४ निष्पाप, निरपराध नागरिकांचा खून केला आहे. दहशत पसरवून आपले आर्थिक हित जोपासणे हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नक्षलवादी आजतागायत काम करत आले आहेत. त्यांचा खरा चेहरा दुर्गम-अतिदुर्गम भागातील जनतेसमोर सातत्याने येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details