महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तालुका टास्क फोर्समुळे गर्भवती महिलांना मिळाले जीवदान, एकीची सुखरूप प्रसूती, दुसरीवर उपचार सुरू

अतिशय दुर्गम व संवेदनशील असलेल्या या गावाला आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 3 जुलैला वेंगनूर गावाला भेट दिली  होती. दोन्ही महिलांची प्रसूतीची वेळ जवळ आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र, कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला.

तालुका टास्क फोर्समुळे गर्भवती महिलांना मिळाले जीवदान

By

Published : Jul 25, 2019, 10:52 PM IST

गडचिरोली -जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये जाण्यासाठी धड रस्ता नसल्याने वाहने जाऊ शकत नाही. त्यामुळे अनेक जण रुग्णालयात न जाता गावातच वैदूकडे उपचार घेणे पसंत करतात. अनेक महिलांची प्रसूती ही घरीच करतात. ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच तालुका टास्क फोर्सने दुर्गम भागातील दोन महिलांना वेळेवर रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे एकीची सुखरूप प्रसूती झाली असून दुसऱ्या महिलेवर उपचार सुरू आहे. मीना नरोटे व लता गावडे (रा. वेंगनूर ता. चामोर्शी) अशी महिलांची नावे आहेत.

तालुका टास्क फोर्समुळे गर्भवती महिलांना मिळाले जीवदान

अतिशय दुर्गम व संवेदनशील असलेल्या या गावाला आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 3 जुलैला वेंगनूर गावाला भेट दिली होती. दोन्ही महिलांची प्रसूती वेळ जवळ आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्या दोघींचीही प्रकृती चांगली नव्हती. तरीही त्यांनी व कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. रेगडी प्राथमिक आरेाग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित महिलांचे व कुटुंबियांचे लेखी घेवून पून्हा गांभीर्याची जाणीव करून दिली. मात्र, पुन्हा नकारच मिळाला.

त्यांनी हा विषय सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री यांच्या सहाय्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे मांडला. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कार्यवाही सुरू केली. तालुका टास्क फोर्स नैसर्गिक किंवा इतर आपत्तीमध्ये कार्य करताना दिसतो. मात्र, या ठिकाणी फोर्सने आपतकालीन स्थिती समजून दोन्ही महिलांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले. महसूल यंत्रणा, आरेाग्य विभाग व पोलीस यांचा समावेश असलेल्या या आपतकालीन टास्क फोर्सने दोघींच्याही घरी जाऊन विनंती केली, 24 जुलैला रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आज 25 जुलैला मीना नरोटे यांची सुखरूप प्रसुती झाली. बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. लता गावडे या दुसऱ्या गर्भवती महिलेवर उपचार सुरू आहेत. दोन्ही महिलांना वेळेवर उपचार मिळाले नसते तर, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.

ABOUT THE AUTHOR

...view details