गडचिरोली - कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करता यावा, यासाठी स्थानिक जिल्हा आपत्ती प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑक्सिजन प्लॅन्टला गुरुवारी विज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लॅन्टसाठी तत्काळ वीजपुरवठा मिळावा यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रुडे यांनी महावितरणकडे अर्ज केला होता. त्यावर तातडीने कार्यवाही करून महावितरण गडचिरोलीने वीज पुरवठ्यासाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करून वाहिनी उभारणीचे काम त्वरीत सुरू केले.
गडचिरोलीतील जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्टला मिळाला वीजपुरवठा
कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना ऑक्सीजन पुरवठा करता यावा, यासाठी स्थानिक जिल्हा आपत्ती प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे ऑक्साीजन प्लॅन्ट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑक्सीजन प्लॅन्टला गुरुवारी विज पुरवठा सुरु करण्यात आला आहे.
बॅकफीडचाही वीजपुरवठा उबलब्ध
जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे अंदाजपत्र तरयार करण्यात आले. त्यानंतर विद्युत निरीक्षक कार्यालयाने उभारण्यात आलेल्या विद्युत यंत्रणेचे परीक्षण करून वीजपुरवठा सुरू करण्यास परवानगी दिली. परवानगी मिळाल्यावर गुरुवारी महावितरण गडचिरोली मंडळातील प्रभारी अधिक्षक अभियंता रवींद्र गाडगे, गडचिरोली विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर, गडचिरोली उपविभागाचे प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम वंजारी, गडचिरोली संकुल विज वितरण केंद्राचे सहायक अभियंता प्रफुल्ल पिंपळकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १७ जून) पुरवठा सुरू करण्यात आला. या ऑक्सिजन प्लॅन्टला एक्स्प्रेस फीडरवरून वीजपुरवठा देण्यात आला असून, मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार कॉम्प्लेक्स फीडला बॅकफीडचाही वीजपुरवठा उबलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे या प्लॅन्टचा वीजपुरवठा अबाधित राहणार आहे.