महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत 'लोकशाहीच्या बॅलेटला, नक्षल्यांच्या बुलेटचे' चॅलेंज; हेलिकॉप्टरद्वारे पोलिंग पार्ट्या रवाना - assembly elections in gadchiroli latest news

सोमवारी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, आरमोरी या तीनही विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदान होणार आहे. तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये 930 मतदान केंद्र आहेत. तर 7 लाख 74 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तीनही विधानसभा क्षेत्रांमध्ये शनिवारी हेलिकॉप्टरद्वारे 418 पोलिंग पार्ट्या बेस कॅम्पवर पोचविण्यात आल्या. तर काही पार्ट्या खासगी बसद्वारे बेस कॅम्पवर पोहचल्या. या सर्व पाट्या आता पोलिसांच्या सुरक्षेत मतदान केंद्रावर पोहोचविल्या जात आहेत.

गडचिरोली विधानसभा निवडणूक 2019

By

Published : Oct 20, 2019, 3:09 PM IST

गडचिरोली - नक्षलग्रस्त गडचिरोलीत 'लोकशाहीच्या बॅलेटला, नक्षल्यांच्या बुलेटचे' चॅलेंज असल्याने अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर हेलिकॉप्टरद्वारे शनिवारपासून पोलिंग पार्ट्या रवाना केल्या जात आहेत. यासाठी वायुसेनेचे 4 आणि जिल्हा पोलीस दलाचा 1, असे एकूण 5 हेलिकॉप्टर गडचिरोली मुख्यालयात दिमतीला आहेत. तर तीनही विधानसभा क्षेत्रांमध्ये शनिवारी हेलिकॉप्टरद्वारे 418 पोलिंग पार्ट्या बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आल्या आहेत.

गडचिरोली विधानसभा निवडणूक 2019

हेही वाचा -धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्यावर पंकजा मुंडे समर्थक संतप्त, परळी पोलिसांत गुन्हा दाखल

सोमवारी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, आरमोरी या तीनही विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदान होणार आहे. तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये 930 मतदान केंद्र आहेत. तर 7 लाख 74 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तीनही विधानसभा क्षेत्रांमध्ये शनिवारी हेलिकॉप्टरद्वारे 418 पोलिंग पार्ट्या बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आल्या. तर काही पार्ट्या खासगी बसद्वारे बेस कॅम्पवर पोहोचल्या. या सर्व पार्ट्या आता पोलिसांच्या सुरक्षेत मतदान केंद्रावर पोहोचविल्या जात आहेत.

हेही वाचा -कडक सुरक्षाव्यवस्थेत कमलेश तिवारींवर अंत्यसंस्कार

तीनही विधानसभा क्षेत्रांमध्ये अतिसंवेदनशील मतदानकेंद्रांची संख्या अधिक आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे प्रशासनाने अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. निवडणूक निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी तब्बल 15 हजार जवान बंदोबस्तावर आहेत. तर 4120 कर्मचारी मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष कार्य करणार आहेत. 96 ठिकाणी वेब कास्टिंग तर 100 ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. जिल्ह्यात 5 सखी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. निवडणुकीसाठी 50 सूक्ष्म निरीक्षकही नेमण्यात आले आहे. तर मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details