गडचिरोली :महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील ( Police-Naxal clashes ) धोडराज पोलीस ठाणे परिसरातील (Gadchiroli Naxalite Area) दुर्गम भागात पोलीस जवानांकडून शोधमोहीम राबविली जात होती. या दरम्यान नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात सकाळी चकमक झाली. तेव्हा नक्षलवाद्यांनी सुरू केलेल्या गोळीबाराचा C60 नक्षल विरोधी पथकाने मुकाबला केला. या चकमकीत एक C-60 पथकातील पोलिस जवान जखमी झाला आहे.
गडचिरोलीत शोध मोहिमेदरम्यान पोलीस-नक्षलांमध्ये चकमक; 1 जवान जखमी - धोडराज पोलीस ठाणे परिसर
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील ( Police-Naxal clashes ) धोडराज पोलीस ठाणे परिसरातील (Gadchiroli Naxalite Area) दुर्गम भागात पोलीस जवानांकडून शोधमोहीम राबविली जात होती. तेव्हा नक्षलवाद्यांनी सुरू केलेल्या गोळीबाराचा C60 नक्षल विरोधी पथकाने मुकाबला केला.
![गडचिरोलीत शोध मोहिमेदरम्यान पोलीस-नक्षलांमध्ये चकमक; 1 जवान जखमी Police-Naxal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15180313-914-15180313-1651560270681.jpg)
Police-Naxal
जखमी झालेल्या जवानाला हेलिकॉप्टरद्वारे तातडीने नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या भागात अतिरिक्त पोलीस कुमक रवाना करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांना उत्तर देण्यासाठी पोलीस दलाने तयारी सुरू केली आहे. सकाळी सुरू झालेली चकमक सुमारे अर्धा तास चालली. 12 पोलीस पार्टीज या विशेष अभियानात होत्या, असेही पोलिसांतर्फे सांगण्यात आले.
Last Updated : May 3, 2022, 5:18 PM IST