गडचिरोली - गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांनी हल्ला चढविला. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत जवानांनी 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. रविवारी सायंकाळी चार ते पाच वाजताच्या सुमारास कोसमी-किसनेली जंगल परिसरात ही चकमक झाली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन पुरुष, तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
गडचिरोलीत पोलीस चकमकीत 5 नक्षलवादी ठार - गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान
गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत जवानांनी 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
![गडचिरोलीत पोलीस चकमकीत 5 नक्षलवादी ठार Police-Naxal clash](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9224084-thumbnail-3x2-gadchiroli.jpg)
उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित होते. त्यावळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. प्रत्युत्तरात सी-60 जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये 5 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी-60 जवानांना यश आले.
घटनेनंतर सी-60 जवानांच्या मदतीला पोलीस मुख्यालयातून हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह हेलिकॉप्टरद्वारे पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. मृत नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. ग्यारापत्ती हद्दीतील कसनेली घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. नवनियुक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिलीच ही मोठी नक्षलविरोधी कारवाई आहे.