गडचिरोली - नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला. या हल्ल्यात १६ जवानांना वीरमरण आले. मात्र, असा हल्ला होईल, अशी पूर्वसूचना राज्याच्या गुप्तचर विभागाने दिली होती. याकडे दुर्लक्ष केल्याने हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गडचिरोली हल्ला : गुप्तचर विभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष ? - ignore
स्फोट झालेल्या भागात नक्षलवादी कारवाई होण्याची शक्यता असल्याची पूर्वसूचना पोलीस मुख्यालयाला देण्यात आली होती. घटनास्थळाच्या परिसरात १०० नक्षल सक्रिय असल्याचे सांगण्यात आले होते. या माहितीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले, असे सांगण्यात येत आहे.
गडचिरोली हल्ला : गुप्तचर विभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष ?
स्फोट झालेल्या भागात नक्षलवादी कारवाई होण्याची शक्यता असल्याची पूर्वसूचना पोलीस मुख्यालयाला देण्यात आली होती. घटनास्थळाच्या परिसरात १०० नक्षल सक्रिय असल्याचे सांगण्यात आले होते. या माहितीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले, असे सांगण्यात येत आहे. या माहितीकडे दुर्लक्ष करणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.