गडचिरोली- रायफल साफ करत असताना चुकून गोळी सुटून डोक्याला लागल्याने सिरोंचा पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. संजीव रामय्या शेट्टीवार (वय-३०, रा. नरसिंहपल्ली ता. सिरोंचा) असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. ते मागील दोन वर्षांपासून सिरोंचा पोलीस ठाण्याच्या शीघ्र कृती दल (QRT) पथकात कार्यरत होते.
गडचिरोलीत रायफल साफ करताना गोळी सुटून पोलीस शिपायाचा मृत्यू
ही घटना मंगळवारी सकाळी घडली. संजीव रामय्या शेट्टीवार (वय-३०, रा. नरसिंहपल्ली ता. सिरोंचा) असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे.
संजीव शेट्टीवार हे सिरोंचा येथील सीआरपीएफ वसाहतीमध्ये कुटुंबासोबत राहत होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास ते स्वतः ची रायफल साफ करत असताना रायफलमधून चुकून गोळी सुटली आणि त्यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
त्यांना शेट्टीवार यांना तत्काळ सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तेलंगणा राज्यातील वरंगल येथे हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी व २ वर्षाची मुलगी आहे.