गडचिरोली - जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी गडचिरोली शहरातील आशीर्वादनगरात मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी गुन्हे शाखेने 1 लाख 29 हजार रुपये रोख व 4 दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी ११ जणांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात शहरातील काही व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊनमध्ये चालणारा पत्यांचा डाव पोलिसांनी उधळला, गडचिरोलीत 11 जणांना अटक - लॉकडाऊनमध्ये चालणारा पत्यांचा डाव उधळला
गडचिरोली शहरातील आशिर्वादनगरात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गुन्हे शाखेने 1 लाख 29 हजार रुपये रोख व 4 दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी ११ जणांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये चालणारा पत्यांचा डाव पोलिसांनी उधळला
गडचिरोली शहरातील आशीर्वादनगर परिसरातील प्रवीण प्रमोद रक्षमवार यांच्या घरी रात्रीच्या सुमारास जुगार अड्डा सुरू होता. याबाबतची गोपनीय माहिती गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रक्षमवार यांच्या घरी धाड टाकली.
लॉकडाऊनमध्ये चालणारा पत्यांचा डाव पोलिसांनी उधळला