महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चातगावात दारूविक्रेत्यांच्या घरी महिलांची धाड; दहा हजाराची मोहाची दारू, सडवा जप्त - Mukti squad police action Chatgaon liquor sale

महिलांनी मुक्तिपथ चमू आणि चातगाव पोलिसांना दारू विक्रीबाबत माहिती दिली. सर्वांनी मिळून तीन विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून दारू, सडवा आणि परिसरात लपवून ठेवलेल्या गावठी दारूच्या कॅन जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी मनकाबाई पोटावी, संतोष धूर्वे आणि वर्षा उइके या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gadchiroli
जप्त केलेला अवैध दारूसाठा

By

Published : Jan 11, 2020, 7:43 PM IST

गडचिरोली- गावठी दारूची विक्री करणार्‍या तिघांच्या घरी पोलिसांच्या सहकार्याने धाड टाकून दारूचा साठा महिलांनी जप्त केला. ही कारवाई धानोरा तालुक्यातील चातगाव येथे करण्यात आली. तब्बल दहा हजाराची मोहाची दारू, सडवा व इतरही साहित्य महिलांनी ताब्यात घेतले आहे.

अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करताना महिला

१० ते १२ वर्षांपासून चातगाव येथे दारूविक्री बंद आहे. पण काही महिन्यांपासून चार जण लपून छपून गावठी दारूची विक्री करीत असल्याचे महिलांच्या लक्षात आले. यात दोन महिला विक्रेत्यांचाही समावेश आहे. येथील महिलांनी या विक्रेत्यांना दारूची विक्री न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, विक्रेते ऐकण्यास तयार नव्हते व ते महिलांनाच शिवीगाळ करत होते. त्यामुळे, महिलांनी मुक्तिपथ चमू आणि चातगाव पोलिसांना याची माहिती दिली. सर्वांनी मिळून तीन विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून दारू, सडवा आणि परिसरात लपवून ठेवलेल्या गावठी दारूच्या कॅन जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी मनकाबाई पोटावी, संतोष धूर्वे आणि वर्षा उइके या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुन्हा दारूविक्री केल्यास अथवा गाव संघटनेच्या महिलांना त्रास दिल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा सज्जड दम पोलिसांनी या विक्रेत्यांना दिला आहे. अनेक वर्षांपासून चातगावात दारूविक्री बंद आहे. त्यामुळे दारूविक्री खपवून घेणार नाही, अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली आहे. तर महिलांच्या सदैव पाठीशी असून दारूविक्रेत्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते यांनी सांगितले.

हेही वाचा-विविध मागण्यांसाठी गडचिरोली नगरपालिकेवर धडक मोर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details