महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंडवाना विद्यापीठात लेखणी बंद आंदोलन; कामकाज ठप्प - गोंडवाना विद्यापीठ लेखणी बंद आंदोलन

केंद्र आणि राज्य सरकारने सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करून दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. राज्य शासनाने उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक प्रवर्गाला आयोग लागू केला आहे. मात्र, राज्यातील 14 विद्यापीठातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना आयोगाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

Gondwana University
गोंडवाना विद्यापीठ

By

Published : Sep 24, 2020, 7:09 PM IST

गडचिरोली - गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजपासून लेखणीबंद आंदोलनाला सुरुवात केली. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. राज्यातील महाविद्यालयीन, विद्यापीठीय शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजना, पाच दिवसांचा आठवडा अशा दहा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

गोंडवाना विद्यापीठात लेखणी बंद आंदोलन

राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे महाविद्यालयीन व अकृषी विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. म्हणूनच विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी संघटनेने लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. यानंतरही शासनाने लक्ष न दिल्यास १ ऑक्टोबरपासून आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी संघटनेने दिला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या कृती समितीने गेल्या आठवड्यात ऑनलाइन पद्धतीने बैठक घेऊन 24 ते 30 सप्टेंबर दरम्यान लेखणीबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. तर १ ऑक्टोबरपासून सर्व कर्मचारी काम बंद करून संपात सहभागी होतील, असा इशारा यावेळी देण्यात आला होता. राज्य शासन केवळ तोंडी आश्वासन देत आहे. त्यामुळे विद्यापीठ कर्मचाऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा आरोप या आंदोलनात करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details