गडचिरोली - भारत स्वातंत्र्यानंतरही छत्तीसगढ-महाराष्ट्र सीमेवरील मेटेवाडासारख्या कित्येक आदीवासी गावांमध्ये विकासाचा सूर्य उगवलाच नाही. आदिवासी भागातील गावांना रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
रस्ता नसल्याने रुग्णाला रुग्णालयात नेले खाटावरून - दुर्गम भागात रस्ता नाही -
सोमवारी दुपारच्या दरम्यान महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवरील छत्तीसगढ राज्यातील मेटेवाडा येथील मुरी पांडु पुंगाटी या 12 वर्षीय मुलीची प्रकृती बिघडली होती. या भागात रस्ते नसल्याने तिला खाटेवर झुला बनवून तब्बल 30 किलोमीटर अंतर पायपीट करुन लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणावे लागले. या घटनेमुळे सीमेवरती गावांना मुलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा -लेटरवॉर.. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले राज्यपालांची 'ही' कृती संसदीय लोकशाहीला मारक
मेटेवाडा हे गाव महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवरील छत्तीसगढ राज्यातील नारयपूर जिल्ह्यतील आहे. या गावात 12 घरांची आदिवासी वस्ती आहे. या गावातील नागरिकांना दैवंदिन गोष्टी घेण्यासाठी 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या लाहेरी गावात चालत यावे लागते. तसेच उपचारासाठी देखील त्या गावातील रुग्णांना खाटेवर झुला करून लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत आणावे लागते.
- गावातील रुग्णांना होतोय त्रास -
सोमवारी त्या गावातील मुरी पांडु पुंगाटी या 12 वर्षीय मुलीची प्रकृती बिघडली होती. तिला तब्बल 30 किलोमीटर चालत खाटेवर टाकून लाहेरी येथील दवाखान्यात आणले होते. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे इंटरनेटच्या युगात आदिवासी भागातील अवस्था भयावह असल्याचे चित्र ससोर आले आहे.
हेही वाचा -सैन्यदलाचे चॉपर जम्मूमधील घनदाट जंगलात कोसळले...दोन्ही वैमानिकांचा मृत्यू