गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुलांदा गावालगत बुधवारी पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत महिला नक्षलीला ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 जवानांना यश आले. त्या महिला नक्षलीची ओळख पटली असून ती प्लाटून दलम सदस्य इंदिरा कोरामी होती. तिच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याने शासनाने तिच्यावर सहा लाखांचे बक्षीस ठेवले होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.
'ती' ठार झालेली नक्षली इंदीरा कोरामी; सहा लाखांचे होते बक्षीस
गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान एटापल्ली तालुक्यातील जारावंडी लगतच्या दुलांदा जंगलात अभियान राबवित होते. दरम्यान, लपून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत गावालगत चकमक उडाली. या चकमकीत प्लाटून दलमची सदस्य इंदिरा कोरामी या महिला नक्षलीला कंठस्नान घालण्यात पोलिसांनी यश मिळवले.
बुधवारी गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान एटापल्ली तालुक्यातील जारावंडी लगतच्या दुलांदा जंगलात अभियान राबवित होते. दरम्यान, लपून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत गावालगत चकमक उडाली. या चकमकीत प्लाटून दलमची सदस्य इंदिरा कोरामी या महिला नक्षलीला कंठस्नान घालण्यात पोलिसांनी यश मिळवले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळावर शोध मोहीम राबविली असता विविध नक्षल साहित्य आढळून आले. सी-60 जवानांनी घटनास्थळावर कोम्बिंग ऑपरेशन करून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले. ठार झालेली महिला नक्षली इंदिरा कोरामी ही कसनसूर लगतच्या करेम या गावातील रहिवासी होती. तिने गेल्या दहा वर्षांपासून नक्षल चळवळीत राहून विविध गुन्हे केले. त्यामुळे शासनाने तिच्यावर सहा लाखांचे बक्षीस ठेवले होते.