महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! धान कुटताना झाला स्फोट; एक ठार तर दोन जखमी - धान कुटताना स्फोट एटापल्ली

आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. ती पाईप सदृश्य लोखंडी वस्तु नक्षलवाद्यांचा बॉम्ब असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लुला मडावी यांनी कोंबड्यांना चारा टाकण्यासाठी धान कुटायला हा पाईप घेतला. पाईपने धान कुटत असताना अचानक स्फोट झाला. लुला मडावी यांचे वडील राणु मडावी यांना शेतामध्ये हा पाईप सापडला होता.

धान कुटताना झालेल्या स्फोटातील जखमी प्रकाश मडावी आणि राकेश मडावी

By

Published : Nov 25, 2019, 8:39 PM IST

गडचिरोली - पाईप सदृश्य लोखंडी वस्तुने धान कुटताना त्याचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना एटापल्ली तालुक्यातील कांदोळी गावात घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लुला राणु मडावी(वय 24) असे मृताचे नाव असून प्रकाश मडावी आणि राकेश मडावी, अशी जखमींची नावे आहेत.

आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. ती पाईप सदृश्य लोखंडी वस्तु नक्षलवाद्यांचा बॉम्ब असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 2014 मध्ये कांदोळी परिसरात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. लुला मडावी यांचे वडील राणु मडावी यांना त्याच परिसरात असलेल्या त्यांच्या शेतामध्ये हा पाईप सापडला होता. त्यांनी तो घरी आणला. गेल्या चार वर्षांपासून त्याचा कोणताही उपयोग झाला नव्हता.

हेही वाचा -परभणीच्या नृसिंह साखर कारखान्यात टरबाइनचा स्फोट; इंजिनीयरचा जागीच मृत्यू, पाच कामगार जखमी

सोमवारी लुला मडावी यांनी कोंबड्यांना चारा टाकण्यासाठी धान कुटायला हा पाईप घेतला. पाईपने धान कुटत असताना अचानक स्फोट झाला. त्यामुळे लुला गंभीर जखमी झाले. तसेच तिथे उपस्थित असलेले प्रकाश आणि राकेशही जखमी झाले. काही वेळातच लुला यांचा मृत्यू झाला. तर, प्रकाश आणि राकेश यांना सुरुवातीला एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details