गडचिरोली - भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रातील जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक जवानाला वीरमरण आले, तर दुसरा जवान जखमी झाला आहे.
भामरागडच्या जंगलात नक्षलवाद्यांचा हल्ला; एका पोलीस जवानाचा मृत्यू , तर एक जखमी - भामरागड नक्षलवादी हल्ला न्यूज
कोठी पोलीस मदत केंद्रातील जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दुशांत नंदेश्वर यांना वीरमरण आले, तर दिनेश भोसले हे जखमी झाले आहेत. दोन्ही जवान कोठी गावात किराणा आणण्यासाठी गेले होते. यादरम्यान नक्षलवाद्यांच्या अॅक्शन टीमने दोन्ही जवानांवर हल्ला केला.
दुशांत नंदेश्वर
दुशांत नंदेश्वर, असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव असून दिनेश भोसले नामक जवान जखमी झाले आहेत. दोन्ही जवान कोठी गावात किराणा आणण्यासाठी गेले होते. यादरम्यान नक्षलवाद्यांच्या अॅक्शन टीमने दोन्ही जवानांवर हल्ला केला. यामध्ये दुशांत नंदेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस मुख्यालयातून घटनास्थळाकडे हेलिकॉप्टर रवाना केले गेले व जखमी असलेल्या जवानाला रुग्णालयात हलवण्यात आले.