गडचिरोली - जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9च्या घरात पोहोचली आहे. तर, दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णांमुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आणखी एकाला कोरोनाची लागण, बाधितांची संख्या ९वर - gadchiroli corona news
आज (गुरुवार) सकाळी साडेआठ वाजता प्राप्त अहवालानुसार आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा रुग्ण आरमोरी तालुक्यातील रहिवासी असून, तो मुंबईहुन परतला आहे. तर, आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा ९ वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे
सोमवारी जिल्ह्यात कोरोनाचे ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर जिल्ह्यातलीत १० ठिकाणे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. यानंतर, मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता आणखी एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नव्याने आढळलेला रुग्ण हा आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील केंद्रात संस्थात्मक विलगीकरणात होता. तसेच त्याने यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ५ रुग्णांसोबत प्रवासादरम्यान संपर्कात आला होता. तर, बुधवारी चामोर्शी व कुरखेडा तालुक्यात पुन्हा दोन रुग्ण आढळून आले होते.
आज (गुरुवार) सकाळी साडेआठ वाजता प्राप्त अहवालानुसार आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा रुग्ण आरमोरी तालुक्यातील रहिवासी असून, तो मुंबईहुन परतला आहे. त्याला मुंबईहुन गावात परत येताच आरमोरी येथील संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडून आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा ९वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.