गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका इसमाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना १४ मे रोजी उघडकीस ( Killing of a person by Naxals ) आली. रामजी तिम्मा वय ४० वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव ( Murder by Naxals ) आहे. एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र हालेवारा अंतर्गत येत असलेल्या मेंढरी या गावातील तो रहिवासी आहे.
नक्षलवाद्यांनी हत्या करून मृत शरीराजवळ टाकलेल्या पत्रकात रामजी तिम्मा हा आत्मसमर्पित नक्षल असून, पोलिसाचा खबरी असल्याच्या संशय व्यक्त केला आहे. मागील झालेल्या एका घटनेत पोलिसांना सहकार्य करत एका नक्षल कमांडरला मारण्यात मृतकाचा हात असल्याचा पत्रकात उल्लेख केलेला आहे.