गडचिरोली - राज्यभरात सर्वत्र निवडणुकीचा उत्साह कायम असून, सकाळपासूनच जिल्ह्यातील मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत.
गडचिरोलीत निवडणुकीचे कर्तव्य बजावताना एका 'न्यूटन'चा मृत्यू - gadchiroli election news
निवडणुकीचे कर्तव्य बजावत असताना एका शिक्षकाचा भोवळ येऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जिलबापू पांडू गावडे (वय 45) असे मृत शिक्षकांचे नाव असून, एटापल्लीच्या बेस कॅम्पवर काल (20 ऑक्टो) ला भोवळ येऊन ते खाली कोसळले.
![गडचिरोलीत निवडणुकीचे कर्तव्य बजावताना एका 'न्यूटन'चा मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4821730-thumbnail-3x2-gad.jpg)
परंतु,जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. निवडणुकीचे कर्तव्य बजावत असताना एका शिक्षकाचा भोवळ येऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली. जिलबापू पांडू गावडे (वय 45) असे मृत शिक्षकांचे नाव असून, एटापल्लीच्या बेस कॅम्पवर काल (20 ऑक्टो) ला भोवळ येऊन ते खाली कोसळले. यानंतर त्यांना एटापल्ली येथे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्राथमिक उपचार करून कुटुंबासह त्यांना चंद्रपूर येथे दोन वाजता पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले. आज पहाटे त्यांचे दवाखान्यात निधन झाल्याची माहिती मिळत आहे.
भोवळ येऊन खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला व मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.