गडचिरोली : अहेरी-चंद्रपूर मार्गावरील लगाम चेकनाका येथे सकाळच्या सुमारास मोटार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना तात्काळ अहेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अहेरी- चंद्रपूर मार्गावर मोटारीची ट्रकला धडक; एक ठार, दोघे गंभीर - aheri- chandrapur highway
अहेरी-चंद्रपूर मार्गवरील लगाम चेकनाका येथे सकाळच्या सुमारास मोटार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ अहेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लगाम चेकनाक्याजवळ असणाऱ्या हनुमान मंदिराजवळ सकाळी ८.४५ च्या दरम्यान हा अपघात झाला. संबंधित मोटार चंद्रपूरच्या दिशेने भरधाव येत होती. वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने मोटारीने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरात धडक दिली. यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला.
या मोटारीतील श्यामराव गुंडावार (वय ४८) हे जागीच ठार झाले. तर त्यांचा नातेवाईक मोहनीष एग्लोपवार (वय २१) आणि वाहनचालक सुधीर दासरवार (वय १९) हे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर अहेरीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.