गडचिरोली -राज्यात पहिल्यांदाच ऑनलाईन परिक्षा पध्दत राबविण्यात येत आहे. या पध्दतीनुसार आजपासून राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजीत करण्यात आल्या होत्या. तांत्रिक अडचणीचे कारणामुळे अमरावती विद्यापीठासह काही विद्यापीठांनी आज होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलल्या. मात्र अतिदुर्गम भागात इंटरनेट सेवेचा अभाव असतानाही गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने पहिला पेपर यशस्वीरित्या घेतला असून पहिल्या दिवशी तब्बल 10 हजार 685 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
गोंडवाना विद्यापीठ : पहिल्या पेपरचे यशस्वी आयोजन; 10 हजार 685 विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन परीक्षा - गोंडवाना विद्यापीठ न्यूज
आज पेपरच्या पहिल्या सत्रामध्ये 2902, दुसऱ्या सत्रामध्ये 2623, तिसऱ्या सत्रामध्ये 3238, चौथ्या सत्रामध्ये 457, पाचव्या सत्रामध्ये 1465 विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिली. महत्वाचे म्हणजे पहिल्या पेपरला 98 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर, अंतिम वर्षाच्या विविध 105 अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यातील 212 महाविद्यालयांचे 18 हजार 500 विद्यार्थी परिक्षा देत आहेत.
राज्य सरकारच्या निर्णयानंतर राज्यात टप्या टप्यात राज्यातीलविद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास सुरूवात झाली. मुंबई, पुणे, नागपुर अशा अनेक विद्यापीठांच्या सध्या परिक्षा सुरु आहेत. यानतंर आता गडचिरोली विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. तत्पूर्वी 5 ऑक्टोबरला गोंडवाना विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा होणार होती. मात्र पहिल्याच पेपरला इंटरनेटची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पहिला पेपरच रद्द करण्याची नामुष्की गोंडवाना विद्यापीठावर आली होती. मात्र, आता नव्या वेळापत्रकानुसार आजपासून ऑनलाइन परीक्षेला सुरुवात झाली. सकाळी 8.30 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पाच सत्रामध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या पेपरसाठी 10 हजार 685 विद्यार्थी पात्र झाले होते.
आज पेपरच्या पहिल्या सत्रामध्ये 2902, दुसऱ्या सत्रामध्ये 2623, तिसऱ्या सत्रामध्ये 3238, चौथ्या सत्रामध्ये 457, पाचव्या सत्रामध्ये 1465 विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिली. महत्वाचे म्हणजे पहिल्या पेपरला 98 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर, अंतिम वर्षाच्या विविध 105 अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यातील 212 महाविद्यालयांचे 18 हजार 500 विद्यार्थी परिक्षा देत आहेत. या सगळ्या विद्यार्थ्याना ग्रुप ऑनलाईन परिक्षा द्यायची आहे. तर सोबतच जिल्ह्यात अकरा ठिकाणी ऑफलाईन सेंटर सुरू करण्यात आले आहेत.