महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या;  कारण अद्यापही अस्पष्ट - गुलदस्त्यात

लाहेरी उपपोलीस ठाण्यात कार्यरत दीपक कुमार या सीआरपीएफ जवानाने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. मात्र, जवानाने आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती अद्याप पुढे आली नाही.

plasma
जवानाचे पार्थिव तर इन्सेटमध्ये जवान दीपक कुमार

By

Published : Apr 27, 2020, 2:36 PM IST

गडचिरोली- भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलीस ठाण्यात कार्यरत दीपक कुमार या सीआरपीएफ जवानाने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. आत्महत्येपूर्वी जवानाने चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. मात्र या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

दीपक कुमार (२७) हा उत्तराखंड राज्यातील (रा. कातुली ता. राणीखेत जि. आलमोरा) येथील रहिवासी होता. 2014 मध्ये तो केंद्रीय राखीव दलात (सीआरपीएफ) दाखल झाला. त्यानंतर बटालियन 37 मिळाल्यानंतर त्याची नियुक्ती लाहेरी उपपोलीस ठाण्यात झाली. लाहेरी परिसर म्हणजे नक्षलवाद्यांच्या नेहमीच घडामोडी असतात. या परिसरात रस्त्यांमुळे वाहतुकीची मोठी समस्या आहे. त्यातच घनदाट जंगलमय परिसर असल्याने मोबाईल सेवेचाही अभाव आहे. अनेकदा वीज गुल असते. त्यामुळे अनेकदा नक्षल हालचाली घडतात. म्हणूनच या परिसरात केंद्रीय राखीव दलाची बटालियन कार्यरत आहे.

दीपक कुमार याने रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास स्वत:कडील बंदुकीतून आपल्या छातीत गोळी घातली. मृत्यूपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली. वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून दिली जात असली, तरी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेनंतर त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आला. मानसिक तणावामुळे पोलीस विभागात असे प्रकार अधूनमधून घडत असतात, याची प्रचिती अनेकदा आली आहे.

यापूर्वीही सीआरपीएफच्या उपनिरीक्षकाने गोळी झाडून केली होती आत्महत्या

केंद्रीय राखीव सुरक्षा दलातील गट क्रमांक-10 चे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे यांनी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली होती. उपनिरीक्षक शिंदे हे शिंदे सावरगाव येथे कार्यरत होते. आत्महत्येनंतर त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असून आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details