गडचिरोली- जिल्ह्यातील देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला असताना केंद्रीय मंत्री तथा भाजपचे स्टार प्रचारक नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा गडचिरोली जिल्हावासियांना 'नागपूर मेट्रो'चे गाजर दाखविले आहे. ते गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ चामोर्शी येथे सोमवारी आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वेमार्ग रखडलेला असला तरी लवकरच या मार्गाचे काम पूर्ण होणार आहे. हा रेल्वेमार्ग गडचिरोलीवरून आदिलाबाद ते मंचेरियलला जोडला जाईल. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर नागपूरमध्ये सुरू झालेली मेट्रो ट्रेन नागभिड मार्गे गडचिरोली पर्यंत आणू. आदिलाबाद-मंचेरीअल रेल्वे मार्गासाठी सर्व्हेक्षण सुरु झाल्याचेही ते म्हणाले.