गडचिरोली : जिल्ह्यात गुरुवारी पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 72 वर पोहचली आहे. तर, आतापर्यंत जिल्ह्यातील 58 जण कोरोनामुक्त झाले असून 13 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात आणखी पाच नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या 72 वर - गडचिरोली कोरोना केसेस बातमी
गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाच्या पाच रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 72 वर पोहोचला आहे. तर, जिल्ह्यात आतापर्यंत 58 जण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले असून 13 सक्रिय रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाच्या पाच रुग्णांची नोंद करण्यात आली. या आढळलेल्या रुग्णांमध्ये धानोरा तालुक्यातील 35 वर्षीय पुरुष, अहेरी तालुक्यातील 20 वर्षीय महिला व 31 वर्षीय पुरुष, चामोर्शी येथील 38 वर्षीय महिला व गडचिरोली येथील एका 51 वर्षीय सीआरपीएफ जवानाचा समावेश आहे. चामोर्शी येथे आढळून आलेली महिला ही पतीसह मुंबई येथून ट्रकने जिल्ह्यात दाखल झाली होती. मुळचे ते चेंबर येथील रहिवासी आहेत. महिलेच्या पतीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर, गडचिरोली येथील सीआरपीएफ जवान हा कोलकता येथून नागपूर मार्गे जिल्ह्यात आला होता. मात्र, त्याची नोंद गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांत केली जाणार नाही. सदर रुग्णाची नोंद औरंगाबाद येथे केलेली आहे. फक्त गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत. त्यामूळे जिल्ह्यात गुरुवारी जरी 6 रुग्ण आढळून आले असले तरी नोंद मात्र, 5 जणांची होणार आहे.
धानोरा तालुक्यातील रुग्ण कर्नाटक येथून आल्यावर त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तर, अहेरी येथील महिला हैदराबाद येथून जिल्ह्यात दाखल झाली होती. तसेच, अहेरी येथील दुसरी महिला रुग्ण ही दिल्ली येथून जिल्ह्यात आली होती. या दोघीही संस्थात्मक विलगीकरणात होत्या. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 72 झाली आहे. आतापर्यंत एकूण 58 कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्या 13 सक्रिय रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.