गडचिरोली - जिल्ह्यात आज मंगळवारी 94 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत 5202 रुग्ण कोरोनातून बरे झाले. तर, एकूण बाधितांची संख्या 6 हजार 110 झाली आहे.
जिल्ह्यांत सद्या 848 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकुण 60 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.14 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 13.88 टक्के तर मृत्यू दर 0.98 टक्के झाला आहे.