महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sunil Tatkare : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लोकसभा लढवणार होते; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट - ग्रामपंचायत निवडणुक

Sunil Tatkare : 2009 मध्येच राष्ट्रवादी (NCP) शिवसेना (Shiv Sena) एकत्र लोकसभा निवडणूक लढवणार होते, असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय. ते आज गडचिरोलीत अजित पवार गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

Sunil Tatkare
Sunil Tatkare

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 5:52 PM IST

Updated : Nov 7, 2023, 10:08 PM IST

गडचिरोलीSunil Tatkare :2009 मध्येच शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लोकसभा लढवणार होते. मात्र काही कारणास्तव निवडणूक लढवता आली नाही, असा खुलासा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. ते गडचिरोली येथे झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज बोलत होते.

भाजपासोबत जाऊन काय चूक केली? :सुनील तटकरे म्हणाले की, 2009 नंतर 2014 मध्येही भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर अनेक स्थित्यंतरं घडली, मग आम्ही भाजपासोबत जाऊन काय चूक केली? असा प्रश्न सुनिल तटकरे यांनी केलाय. अजित पवार यांनी निवडलेल्या मंत्रिमंडळातील लोकांचं अनेकांनी कौतुक केलं. मात्र, आज आपल्यापैकी काहीजण टीका करत आहेत, त्यातील काही उदासीन आहेत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

अजित पवारांशिवाय पर्याय नाही :व्यवस्थेच्या भीतीनं आम्ही भाजपसोबत गेलो, अशी टीकाही विरोधक करत आहेत. आपल्या सावलीला घाबरणाऱ्या लोकांनी आपल्यावर टीका करणं कितपत योग्य आहे? असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला लोकांनी पाठिंबा दिलाय. राज्यातील महिला भगिनींना न्याय द्यायचा असेल, तर अजित पवारांशिवाय पर्याय नाही,असा दावा त्यांनी केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आणायचं आहे. यासाठी सर्वांनी कामाला लागावं, असं आवाहन सुनील तटकरे यांनी केलंय.

लोकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य :यावेळी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर म्हणाल्या, जनतेच्या कामामुळं आम्ही सत्तेत सहभागी झालो. आमच्यासाठी नागरिकांचे प्रश्न म्हत्वाचे होते, त्यामुळं आम्ही भाजपासोबत गेल्याचा दावा चाकणकर यांनी केलाय. यावर राज्यात भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, पण ते फार काळ टिकलं नाही. मात्र, अजित पवार यांनी भावनिक राजकारणाला बळी न पडता लोकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिल्याचं महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. Shambhuraj Desai on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ समाजात निर्माण करताहेत संभ्रम - शंभूराज देसाई
  2. Manoj Jarange Patil : 'भुजबळांच्या पाहुण्यांचं हॉटेल त्यांच्याच लोकांनी फोडलं', मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
  3. GramPanchayat Election : कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाचा डंका, सातारा जावळीत भाजपाची तर पाटणमध्ये शिंदे गटाची घोडदौड
Last Updated : Nov 7, 2023, 10:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details