गडचिरोली - धानोरा तालुक्यातील कारवाफा पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या रेखाटोला जंगलात नक्षलवादी व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली. मंगळवारी (३१मार्च) रात्री झालेल्या या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. एम.रवी असे जखमी जवानाचे नाव आहे.
नक्षलवादी व सीआरपीएफ जवानांमध्ये चकमक ; एक जवान जखमी - gadchiroli naxal news
धानोरा तालुक्यातील कारवाफा पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या रेखाटोला जंगलात नक्षलवादी व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली.
नक्षलवादी व सीआरपीएफ जवानांमध्ये चकमक ; एक जवान जखमी
केंद्रीय राखीव दलाच्या १९२ बटालियनचे जवान मंगळवारी रात्री रेखाटोला परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवून परत येत असताना नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. परंतु, यात एम.रवी नामक जवानाच्या डाव्या पायाच्या मांडीला गोळी लागली. प्रथमोपचारानंतर त्याला नागपूरला हलवण्यात आले आहे. सेव्हन स्टार रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.