गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली तालुका अंतर्गत सुरजगड लोह प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या विरोधात नक्षलवाद्यांनी अनेकदा पत्रकबाजी केली व मागील दोन वर्षी पूर्वी वाहन जाळपोळ केली होती. रविवारी मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
गडचिरोलीतील सूरजागड लोह खनिज प्रकल्पाला मजूर पुरवठा करणाऱ्याची नक्षलवाद्यांकडून हत्या - सूरजागड लोह खनिज प्रकल्प
जिल्ह्यातील एटापल्ली तालुका अंतर्गत सुरजगड लोह प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या विरोधात नक्षलवाद्यांनी अनेकदा पत्रकबाजी केली व मागील दोन वर्षी पूर्वी वाहन जाळपोळ केली होती. रविवारी मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
नक्षलवाद्यांकडून हत्या
हत्या झालेला व्यक्ती एटापल्ली येथील युवकांना सुरजागड प्रकल्पात काम देण्याचे काम करीत होता. हत्या झालेल्या इसमाचे नाव सोमाजी पुंगाटी असून एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील रहिवासी आहे. सुरजागड प्रकल्पाला बंद करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांच्या विरोध नेहमीच दिसत होता. या हत्येमुळे सुरजागड प्रकल्पात दहशतीचे वातावरण आहे.