गडचिरोली- माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला आहे. वाहनांची जाळपोळ, भूसुरुंग स्फोट, पोलीस खबरी म्हणून सामान्य नागरिकांची हत्या असे सत्र सुरूच आहे. अशातच आता नक्षलवाद्यांनी आणखी तीन वाहनांची जाळपोळ केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.
गडचिरोलीत नक्षलींचे थैमान सुरुच; तीन वाहनांची जाळपोळ, लाखोंचे नुकसान - vehicles
बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर पंतप्रधान ग्राम सडक योजना निर्माण काम सुरू आहे. याठिकाणी असलेला एक टँकर, दोन सिमेंट कॉन मशीन, रोड रोलर आणि सेंट्रिंग वापराचे साहित्य रविवारी रात्री नक्षलवाद्यांनी जाळून टाकले.

एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर पंतप्रधान ग्राम सडक योजना निर्माण काम सुरू आहे. याठिकाणी असलेला एक टँकर, दोन सिमेंट कॉन मशीन, रोड रोलर आणि सेंट्रिंग वापराचे साहित्य रविवारी रात्री नक्षलवाद्यांनी जाळून टाकले. यात ठेकेदाराचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
सदर रस्त्याचे काम यवतमाळच्या शाम बाबा कंट्रक्शन कंपनीचे अनिल सेवदा हे करीत असल्याची माहिती असून जाळण्यात आलेली वाहने आणि साहित्य एटापल्ली नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांच्या मालकीचे आहे. गेल्या १५ दिवसातील ही सहावी घटना असून नक्षलवाद्यांच्या कृत्यामुळे सामान्य नागरिकांत मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे.