गडचिरोलीत पोलिंग पार्टीवर नक्षलवाद्यांचा हल्ला; १ सीआरपीएफ जवान जखमी - polling party
![गडचिरोलीत पोलिंग पार्टीवर नक्षलवाद्यांचा हल्ला; १ सीआरपीएफ जवान जखमी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2962634-thumbnail-3x2-naxal.jpg)
2019-04-10 18:20:53
गडचिरोलीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गडचिरोली - मतदानाच्या आदल्या दिवशी नक्षलवाद्यांनी सुरुंग स्फोट घडवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात केंद्रीय पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला. एटापल्ली तालुक्यात गट्टा पोलीस ठाण्यापासून एक किलोमीटर अंतरावर हा स्फोट घडवण्यात आला.
उद्या मतदान असल्याने ईव्हीएम मशीन घेऊन कर्मचारी व सुरक्षा जवान वटेली येथील केंद्राकडे जात असताना वाटेत हा स्फोट झाला. यात केंद्रीय पोलीस दलाचा अमीत पटेल हा जवान जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली असून, मतदान कर्मचारी सुखरूप केंद्रावर पोहोचले आहेत. मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आल्याचे बोलले जात आहे.