गडचिरोली - नक्षलवाद्यांच्या विरोधात गडचिरोली पोलीसांची कारवाई धडाकेबाज आहे. येणाऱ्या काळात लवकरच नक्षलवाद गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यातून संपेल, असा आशावाद पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी व्यक्त केला.
दुर्गम पोलीस ठाण्याला भेटी-

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर आहेत. सावरगाव पोलीस ठाण्याचा दौरा केल्यानंतर पोलीस महासंचालक थेट अतिसंवेदनशील अशा देचलीपेठाच्या पोलीस ठाण्यात पोहचले. तिथे पोलीस ठाण्याच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी जवानांच्या कुटुंबियासह जवानांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस दलातील नोकरीच्या सुरुवातीच्या काळातील जंगलात केलेल्या अभियानाची आठवण ताजी करत गडचिरोली जिल्ह्यात काम करणाऱ्या जवानांच्या कामाचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी कौतुक केले.
हेही वाचा-संतापजनक! आश्रम शाळेतील मुलीवर अधीक्षकानेच केला अत्याचार