गडचिरोली : बांधकाम ठेकेदाराकडून पैसे वसूल करून न दिल्याने नक्षलवाद्यांनी आपल्याच सहकाऱ्याची हत्या केली. ही घटना बुधवारी पोटेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिरोली तालुक्यातील नागवेली येथे उघडकीस आली. सखाराम झगडु नरोटे (वय 33) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
1 सप्टेंबरच्या रात्री 20 ते 25 बंदुकधारी नक्षलवादी सखाराम नरोटे याच्या घरी गेले आणि त्याला व त्याचा भाऊ शामराव अलसु नरोटेला घरुन नेऊन मारहाण केली. त्यानंतर शामराव नरोटे यास गावात सोडुन दिले व सखाराम नरोटे यास जवळच असलेल्या हलामीटोला परिसरात घेऊन गेले. व येडमपायली ते हलामीटोला रोड बांधकाम ठेकेदाराकडून पैसे वसूल करुन नक्षलवादी पार्टीला दिले नाही, या कारणावरुन त्याला बंदुकीची गोळी झाडून ठार केले. सखाराम नरोटे हा सन 2015 पासून नक्षल समर्थक म्हणून कार्यरत असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. तो नक्षलवाद्यांना मदत करीत होता.