गडचिरोली -भामरागड तालुक्यातील ताडगावजवळ रस्त्यावर स्फोटके असल्याच्या संशयावरून भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. या ठिकाणी नक्षलवाद्यांनी सोमवारी रात्री लाल रंगाचे दोन बॅनर बांधले होते. रस्त्याच्या मधोमध दोन डबे ठेवून त्यावर लाल रंगाचे कापड गुंडाळून डब्याच्या दोन्ही बाजूला वायर सोडल्यामुळे त्यात स्फोटके असल्याची भीती निर्माण झाली.
ताडगाव हे भामरागड-आलापल्ली मुख्य मार्गावरील गाव असून या गावापासून ताडगाव पोलीस मदत केंद्र एक किलोमीटर अंतरावर आहे. पोलीस मदत केंद्रापासून हाकेच्या अंतरावर नक्षलवाद्यांनी कापडी बॅनर बांधल्याने नक्षवाद्यांची हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे.