महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार ; एक ठार तर एक जखमी - नक्षलवादी

दोन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे.

जखमी अशोक होळी

By

Published : Sep 11, 2019, 1:03 PM IST

Updated : Sep 11, 2019, 4:39 PM IST

गडचिरोली- दोन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर नक्षलवाद्यांनीच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण ठार झाला असून, एक जण जखमी झाला आहे. ही घटना एटापल्ली तालुक्यातील गिलनगुडा येथे घडली. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली असून जखमीला गडचिरोलीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमी अशोक होळी


अशोक उर्फ नांगसु मासा होळी (वय ३० वर्ष, रा. झारेवाडा, ता.एटापल्ली, जि. गडचिरोली)असे जखमीचे नाव असून किशोर उर्फ मधुकर पेका मद्रामी (वय ३२ वर्ष, रा. नैनवाडी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) हा या हल्ल्यात ठार झाला आहे. आत्मसमर्पित अशोक होळी व मधुकर मट्टामी हे गडचिरोलीवरून वैयक्तिक कामासाठी एटापल्ली तालुक्यातील गिलनगुडा येथे गेले होते. परत येत असताना नक्षलवाद्यांच्या अॅक्शन टीमने दोघांवरही गोळीबार केला. यात अशोक होडी याच्या पायाला दोन गोळ्या लागल्याने तो जखमी झाला आहे. तर मधूकर हा ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यातील अशोक हा नक्षलवाद्यांच्या भामरागड दलामध्ये कार्यरत होता. २०१० साली त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. तर मधुकर हा नक्षलवाद्यांच्या कंपनी क्र. ४ आणि १० मध्ये कार्यरत होता त्याने २०१३ साली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दोघेही गडचिरोलीला राहत होते. ते नातेवाईकांना भेटण्यासाठी अधून-मधून आपापल्या गावी जात होते. सोमवारी दोघेही नातेवाईकांना भेटण्यासाठी गावी गेले. नातेवाईकांना भेटून ते काल (मंगळवार) अशोकच्या घरी जाऊन मोटार सायकलने झारेवाडा येथून गडचिरोलीला निघाले होते. यावेळी गिलनगुडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी दोघांना अडवून गोळीबार केला. त्या हल्ल्यातून पळ काढत अशोक हा गट्टा येथील पोलीस मदत केंद्रात गेला. त्यानंतर त्याला तत्काळ हेलीकॉप्टरने गडचिरोली येथे उपचारासाठी नेण्यात आले. नक्षल्यांच्या तावडीत सापडून मट्टामी ठार झाले.

हेही वाचा - नक्षलवाद्यांची दहशत झुगारून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. चरणजितसिंग सलुजा यांचा राष्ट्रपती जीवन रक्षा पदकाने गौरव

Last Updated : Sep 11, 2019, 4:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details