गडचिरोली -जंगलामध्ये नक्षलविरोधी अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांनी पोलीस दलाच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी युबीजीएल या 300 मीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या अत्याधुनिक शस्ञाचा वापर केला. मात्र, जवानांनी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊन हा हल्ला परतावून लावला. ही घटना कोरची तालुक्यातील लेवारीच्या जंगलात बुधवारी संध्याकाळी घडली.
नक्षलवाद्यांकडून गडचिरोली पोलीस दलावर हल्ला - शहीद सप्ताह गडचिरोली
नक्षल नेता चारू मुजुमदार याच्या स्मृतिप्रीत्यर्थ नक्षलवाद्यांकडून 28 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान 'शहीद सप्ताह' पाळला जाणार आहे. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी पत्रक टाकून बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. ठिकठिकाणी नक्षलविरोधी अभियान सुरू आहे.
नक्षल नेता चारू मुजुमदार याच्या स्मृतिप्रित्यर्थ नक्षलवाद्यांकडून 28 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान 'शहीद सप्ताह' पाळला जाणार आहे. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी पत्रक टाकून बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. ठिकठिकाणी नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. कोरची तालुक्यातील लेवारीच्या जंगल परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी नक्षलविरोधी अभियान सुरू होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष करून युबीजीएल या 300 मीटरपर्यंत मारा करु शकणाऱ्या अत्याधुनिक शस्त्राचा वापर करुन हल्ला केला. मात्र, पोलीस जवानांनी सतर्कता बाळगत नक्षलवाद्यांचा हल्ला परतावून लावला. या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल अधिक सतर्क झाले आहे.