महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती - धानोरा

नक्षलवादी आणि पोलिसांच्या सी-60 दलाच्या जवानांमध्ये धानोरा तालुक्यातील जंगलात चकमक उडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

संग्रहित छायाचित्र

By

Published : May 27, 2019, 3:26 PM IST

Updated : May 27, 2019, 3:33 PM IST

गडचिरोली- नक्षलवादी आणि पोलिसांच्या सी-60 दलाच्या जवानांमध्ये धानोरा तालुक्यातील जंगलात चकमक उडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या चकमकीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी काही नक्षलवादी जखमी झाले असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी काही शस्त्रसाठ्यासह दारुगोळा पोलिसांनी जप्त केला आहे.

धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या दराचीच्या जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडोची शोध मोहीम सुरु होती. त्या दरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केल्याने दहा ते पंधरा मिनिटे चकमक उडाली. मात्र, पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावर शोधमोहीम सुरू केली, मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले. या घटनेनंतर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन तीव्र करण्यात आले आहे.

Last Updated : May 27, 2019, 3:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details