गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान शांततेत सुरू असून संवेदनशील असलेल्या रांगी येथील मतदान केंद्रावर 'आधी मतदान नंतर लगीन' अस म्हणत लग्नापूर्वी नवरदेव मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचला. गौरव पदा असे त्या नवरदेवाचे नाव आहे.
'आधी मतदान नंतर लगीन', बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव पोहोचला मतदान केंद्रावर - गडचिरोली
गौरव पदा असे त्या नवरदेवाचे नाव आहे.
!['आधी मतदान नंतर लगीन', बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव पोहोचला मतदान केंद्रावर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2968140-thumbnail-3x2-gadchirolinavardev.jpg)
नवरदेव गौरव पदा
बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव पोहोचला मतदान केंद्रावर
यावेळी नवमतदारांमध्येही मोठा उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले असले तरी नक्षल्यांच्या बुलेटला झुगारून मतदान करण्यासाठी मतदार मतदान केंद्रावर गर्दी करत आहेत. यावेळी नवरदेवाने देखील बोहल्यावर चढण्याआधी मतदान केंद्रावर येऊन पहिले मतदान करण्याचा हक्क बजावला आहे.