गडचिरोली - जिल्ह्यातील भामरागडमध्ये चार दिवसांपासून पुराचे थैमान सुरू आहे. आता भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचेही सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी वैनगंगा नदी पात्रा बाहेरून वाहत आहे. आष्टी- चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने हा मार्ग आज शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास बंद झाला. तर वैनगंगा नदीचे पाणी उपनद्यांना फेकल्यामुळे गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्ग सह जिल्ह्यातील प्रमुख नऊ मार्ग आज बंद आहेत.
गोसेखुर्दच्या पाण्याने वैनगंगा पात्राबाहेर; गडचिरोली जिल्ह्यातील 4 राष्ट्रीय महामार्गासह 9 प्रमुख मार्ग बंद
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी भामरागड मध्ये पर्लकोटा नदीचे पाणी शिरले होते. पूर ओसरत नाही तोच 24 तासात मंगळवारी दुसऱ्यांदा भामरागडमध्ये पुराचे पाणी शिरले.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी भामरागड मध्ये पर्लकोटा नदीचे पाणी शिरले होते. पूर ओसरत नाही तोच 24 तासात मंगळवारी दुसऱ्यांदा भामरागडमध्ये पुराचे पाणी शिरले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून येथील पूरपरिस्थिती बिकट आहे. भामरागड मधील सुमारे दोनशेहून अधिक घरे पाण्याखाली असून 120 हुन अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
भामरागड मधील पूर आज दुपारपासून ओसरायला सुरू झाले. मात्र परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. ही स्थिती कायम असताना शुक्रवारी सकाळी 11 वाजता गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीने पात्र सोडले आहे. आज दुपारच्या सुमारास आष्टी-चंद्रपूर हा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. तर सकाळी सात वाजताच्या सुमारास गोविंदपूर नाला व पोटफोडी नदीमुळे चामोर्शि मार्ग बंद झाला. तर पाल नदीच्या पुरामुळे गडचिरोली- नागपूर हा मार्ग बंद आहे. तसेच आलापल्ली-भामरागड, असरअली-सोमनपल्ली, हेमलकसा-सुरजागड, कसनसूर-भामरागड-कवंडे, रोमपल्ली-झिंगानूर, अहेरी-बेजूरपल्ली हे मार्ग बंद आहेत.