गडचिरोली - तेलंगणा राज्याचा महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प असलेल्या मेडिगट्टा प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रसोबत केलेल्या कराराचा भंग तेलंगणा सरकारने केल्याचा आरोप करत हा प्रश्न लोकसभेत मांडण्याचा इशारा खासदार अशोक नेते यांनी दिला आहे. तसेच पंतप्रधान मोदींकडेही तक्रार करणार असल्याचे नेते यांनी सांगितले.
'तेलंगणा सरकारकडून मेडिगट्टा प्रकल्पसंदर्भातील कराराचा भंग' - Medigatta Project
मेडिगट्टा प्रकल्प हा गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्याच्या गोदावरी नदीवर बांधण्यात आला आहे. प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील शेतजमिन अद्याप भूसंपादन झालेली नसतानाही पाणी अडवल्याने शेतात पाणी शिरून रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रकल्प बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी प्रकल्पाला भेट दिली. तेव्हा त्यांना हा गंभीर प्रकार दिसून आला. काही दिवसांपूर्वी अहेरीचे आमदार धर्मराव आत्राम यांनी या भागाची पाहणी केली होती. तसेच त्यांनी शेतकऱ्यांसोबत प्रकल्पस्थळी आंदोलन केले होते.
मेडिगट्टा प्रकल्प हा गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्याच्या गोदावरी नदीवर बांधण्यात आला आहे. प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील शेतजमिन अद्याप भूसंपादन झालेली नसतानाही पाणी अडवल्याने शेतात पाणी शिरून रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.