महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली : जिल्ह्यात सरासरी 85 टक्के मतदान; 22 ला होणार मतमोजणी - Gadchiroli Gram Panchayat Election News

गडचिरोलीत पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतीचे मतदान शांततापूर्ण पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यात 20 जानेवारीला दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या बहुतेक ग्रामपंचायती अतिसंवेदनशील क्षेत्रातील असल्याने कोणत्याही अनुचित घटनेविना मतदान शांततेत पार पाडण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणासमोर राहणार आहे.

गडचिरोली ग्रामपंचायत निवडणूक न्यूज
गडचिरोली ग्रामपंचायत निवडणूक न्यूज

By

Published : Jan 15, 2021, 6:46 PM IST

गडचिरोली - पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 170 ग्रामपंचायतीसाठी आज 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील जिल्हा असल्याने इतर जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदान होते. त्यामुळे सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. दुपारी दीड वाजताच्या आकडेवारीनुसार 70.16 टक्के मतदान झाले. अंतिम मतदानाची आकडेवारी अद्याप हाती आलेली नसली तरी सरासरी 85% पेक्षा जास्त मतदान झाल्याचा अंदाज आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात सरासरी 85 टक्के मतदान; 22 ला होणार मतमोजणी

हेही वाचा -EXCLUSIVE : कोल्हापूरातल्या सर्वात लहान ग्रामपंचायतीचे मतदान 11 वाजताच पूर्ण

दुसऱ्या टप्प्यात दीडशे ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारीला मतदान

जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली. मात्र, जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने दोन टप्प्यात ही निवडणूक घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 15 जानेवारीला उत्तर गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली धानोरा आरमोरी कुरखेडा वडसा कोर्ची सहा तालुक्यात निवडणूक पार पडली. तर दुसऱ्या टप्प्यात 20 जानेवारीला दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी अहेरी भामरागड सिरोंचा एटापल्ली आणि मुलचेरा या सहा तालुक्यात मतदान होणार आहे. 360 ग्रामपंचायतींपैकी 40 ग्रामपंचायती अविरोध झाल्या असून प्रत्यक्ष 320 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक आहे. यात पहिल्या टप्प्यात 170 तर दुसऱ्या टप्प्यात 150 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. दोन्ही टप्प्याची मतमोजणी 22 जानेवारी रोजी होणार आहे.

ग्रामीण आदिवासी मतदारांमध्ये होता उत्साह

नक्षलवादी कारवायांसाठी प्रसिद्ध गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही निवडणुकीचे मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत चालते. त्यामुळे सकाळपासूनच मतदानासाठी रांगा दिसून येतात. शहरी भागात दुपारनंतर मतदारांची गर्दी बघायला मिळत असली तरी आजच्या ग्रामपंचायत मतदानदरम्यान ग्रामीण भागातील आदिवासी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. धानोरा तालुक्यातील चातगाव, कुलभट्टी, मुरुमगाव, सलेभट्टी आदी ठिकाणी मतदानासाठी सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा होत्या. काही मतदान केंद्रावर दुपारी एक ते दोन वाजताच मतदान आटोपले होते.

एकूणच पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतीचे मतदान शांततापूर्ण पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यात 20 जानेवारीला दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या बहुतेक ग्रामपंचायती अतिसंवेदनशील क्षेत्रातील असल्याने कोणत्याही अनुचित घटनेविना मतदान शांततेत पार पाडण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणासमोर राहणार आहे.

हेही वाचा -नांदगांव तालुक्यातील पानेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवाराचे नाव गायब

ABOUT THE AUTHOR

...view details