गडचिरोली - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी शासकीय रुग्णालयात मदत म्हणून 500 लिटर सॅनिटायझर आमदार रोहित पवार यांनी दिले. यावेळी प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालसकर व जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रूडे यांनी सॅनिटायझर स्विकारले.
आमदार रोहित पवार यांच्याकडून गडचिरोली जिल्ह्याला 500 लिटर सॅनिटायझर - mla rohit pawar
आमदार रोहित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याला 500 लिटर सॅनिटायझरची मदत केली आहे.
सदर सॅनिटायझर बारामती ॲग्रोटेक येथून पाठविण्यात आले. जिल्हयातील विविध वैद्यकीय संस्थांमध्ये त्याचा वापर व्हावा. तसेच कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी सदर मदत आमदार रोहीत पवार यांच्याकडून दिल्याचे भाग्यश्री हलगेकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर, जिल्हा महिला अध्यक्ष सोनाली पुण्यपवार, प्रा. ॠषीकेष पापडकर, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस श्रीनिवास गोडसेलवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, सचिव संजय कोचे, ओमप्रकाश संग्राम उपस्थित होते.