गडचिरोली - नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असेलेल्या अहेरी विधानसभा मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून आमसभा घेण्यात आली.
जिल्ह्याच्या विकासासाठी आमसभेचे आयोजन; आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतला आढावा - आमदार धर्मराव बाबा आत्राम
नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असेलेल्या अहेरी विधानसभा मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून आमसभा घेण्यात आली.

अहेरी विधानसभा मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून आमसभा घेण्यात आली.
अहेरी विधानसभा मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून आमसभा घेण्यात आली.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत, सर्व तालुक्यांमधील समस्या जाणून घेण्यासाठी तसेच जनसंपर्क बळकट करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. याचसोबत भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व मुलचेरा या चारही तालुक्यांमध्ये आमसभेचे आयोजन केल्याची माहिती आत्राम यांनी दिली. यामध्ये रोजगार, शिक्षण व सिंचनावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
या वेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासोबत बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, सामाजिक कार्यकर्ते ऋतुराज हलगेकार तसेच अन्य समर्थक उपस्थित होते. निवडून आल्यानंतर प्रथमच भामरगड तालुक्यातील लाहेरी येथे आल्यानंतर आदिवासी बांधवांनी त्यांचे पारंपरिक रेला नृत्याने स्वागत केले. भामरगडमध्ये रस्ते, वीज, पाणी व आरोग्य या मुलभूत सोयींची वानवा असल्याने स्थानिकांनी सोई सुविधा पुरवण्याची मागणी केली.