गडचिरोली -केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात देशव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. या 'भारत बंद'ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी, विविध विभागातील सहा हजार कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
'भारत बंद'ला गडचिरोलीत संमिश्र प्रतिसाद; सहा हजार कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक - गडचिरोलीत बंद
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालवर धडकल्यानंतर एक सभा घेण्यात आली. या सभेमध्ये अनेकांनी मनोगत व्यक्त करताना मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला. कामगारांच्या हितासाठी चांगल्या योजना राबवून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. सात जणांच्या शिष्टमंडळाने कामगारांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना दिले.

'भारत बंद'ला गडचिरोलीत संमिश्र प्रतिसाद
'भारत बंद'ला गडचिरोलीत संमिश्र प्रतिसाद
हेही वाचा -मुंबईत 'भारत बंद'चा परिणाम नाही; जनजीवन सुरळीत
कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ, प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना, अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटना, शालेय पोषण आहार संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, आशा वर्कर संघटना, अशा विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.