महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुरजागड लोह प्रकल्पात दोन हजार युवकांना नियुक्ती पत्र - गडचिरोली पालकमंत्री एकनाथ शिंदे बातमी

पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत खाण परिसरात रुग्णालय- प्रशिक्षण अकादमी आदी सुविधांची  सुरुवात झाली. या दक्षिण गडचिरोली भागात 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची संभावना पालकमंत्री शिंदे यांनी बोलून दाखविली. अतिदुर्गम भागातील नक्षलवाद संपवायचा असेल तर विकास महत्वाचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या भागाला भारताचे नवे जमशेदपूर करण्यासाठी रेल्वे जाळे पसरविण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त झाली.

minister eaknath shinde gived letter of appointment two thousand youths in surjagad iron project in gadchiroli
सुरजागड लोह प्रकल्पात दोन हजार युवकांना नियुक्ती पत्र

By

Published : May 1, 2022, 2:01 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील महत्वाकांक्षी सुरजागड लोहखनिज प्रकल्पात 2000 स्थानिक आदिवासी युवकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रोजगार नियुक्तीपत्रे देण्यात आली. चालक- गार्ड- क्रेन चालक- क्रशर चालक- कामगार अशी ती नियुक्ती पत्रे दिली गेली. पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत खाण परिसरात रुग्णालय- प्रशिक्षण अकादमी आदी सुविधांची झाली सुरुवात करण्यात आली. या भागात 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची पालकमंत्री शिंदे यांनी घोषणा केली.


पारंपरिक आदिवासी नृत्ये सादर करून कार्यक्रमाची सुरुवात -2000 स्थानिक आदिवासी युवकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रोजगार नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. स्थानिकांना इथल्या खाणीत रोजगार या महाकाय प्रकल्पातील कळीचा मुद्दा होता. पारंपरिक आदिवासी नृत्ये सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. चालक- गार्ड- क्रेन चालक- क्रशर चालक- कामगार अशी नियुक्तीपत्रे स्थानिक युवक-युवतींना दिली गेली. पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत खाण परिसरात रुग्णालय- प्रशिक्षण अकादमी आदी सुविधांची सुरुवात झाली. या दक्षिण गडचिरोली भागात 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची संभावना पालकमंत्री शिंदे यांनी बोलून दाखविली. अतिदुर्गम भागातील नक्षलवाद संपवायचा असेल तर विकास महत्वाचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या भागाला भारताचे नवे जमशेदपूर करण्यासाठी रेल्वे जाळे पसरविण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त झाली.

प्रशिक्षित युवक-युवतींना सुरजागड लोहखनिज प्रकल्पात नोकरी -दक्षिण गडचिरोलीच्या एटापल्ली परिसरातील प्रशिक्षित युवक-युवतींना सुरजागड लोहखनिज प्रकल्पात नोकरी दिली गेल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या भागाचा रोजगार निर्मिती करून जलद विकास साधला जाईल, अशी सार्वत्रिक भावना व्यक्त झाली.

जानेवारी 2023 पर्यंत कोनसरी प्रकल्प होणार सज्ज - सुरजागड लोह खनिज प्रकल्पातील कच्चे लोखंड गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी भागात प्रक्रिया प्रकल्प उभारून पोलाद निर्मिती केली जाणार आहे. जानेवारी 2023 पर्यंत कोनसरी प्रकल्प यासाठी सज्ज झाला असेल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. सुरजागड प्रकल्पात आजच्या स्थानिकांना रोजगार नियुक्तीने विकासाला चालना मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details