गडचिरोली - जिल्हा प्रशासनाकडून शहरातील गोर-गरीब, गरजूंना सकाळी नाश्ता व रात्रीचे जेवण 'मील ऑन व्हील' योजनेतून ५ रुपयांमध्ये देण्यात येत आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठाणमधून एकूण जमा रकमेच्या ३० टक्के निधी कोविड-१९ करीता खर्च करण्याचे आदेश केंद्र तसेच राज्य शासनाने नुकतेच प्रशासनाला दिले आहेत. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर गडचिरोली शहरातील गरजू लोकांसाठी जेवणाचे २५० पार्सल दररोज गरजूंना गाडीतून शहरात पोहचविले जात आहेत.
'अन्नपूर्णा आपल्या दारी': गडचिरोली शहरातील गरजूंना दररोज ५ रुपयात फिरत्या गाडीतून जेवण - मील ऑन व्हिल गडचिरोली
शहरात आश्रयास असलेले मजूर, गरीब, भिक्षेकरी, छोटे व्यावसायिक, जवळील भागातून भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी, दवाखान्यातील रुग्णांचे नातेवाईक आदींना अल्प दरात जेवणाची सोय यातून होत आहे. ज्यांच्याकडे ५ रूपये सुद्धा नाहीत, त्यांनाही मोफत जेवणाचे पार्सल दिले जात आहे.
जिल्हा प्रशासनाकडून योजनेच्या अंमलबजावणीसाठी गडचिरोली नगरपरिषदेला निधी वर्ग करण्यात आला आहे. नगरपरिषदेकडून हे काम महिला अर्थिक विकास महामंडळ, गडचिरोलीद्वारा संचलित अन्नपूर्णा माय खानावळ, सखी लोकसंचलित साधन केंद्रामार्फत अन्न शिजवून व पॅकींग करून दिले जात आहे. शहरात आश्रयास असलेले मजूर, गरीब, भिक्षेकरी, छोटे व्यावसायिक, जवळील भागातून भाजीपाला घेवून आलेले शेतकरी, दवाखान्यातील रुग्णांचे नातेवाईक इत्यादींना अल्प दरात जेवणाची सोय यातून होत आहे. ज्यांच्याकडे ५ रुपये सुद्धा नाहीत त्यांनाही मोफत जेवणाचे पार्सल दिले जात आहे.